सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाचे मिळून महाविकास आघाडी सरकार आहे. परंतु जिल्ह्यात महा विकास आघाडीचे सर्वपक्षीय एकत्र निवडणूक लढणार नाहीत. परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते काका साठे यांनी येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांत आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे.शनिवार पासून त्यांनी आढावा बैठक घेण्याचा सपाटा सुरू केला असून त्यांनी वांगी व पडसाळी गावात बोलत असताना आपण आता कोणाशी युती करणार नसून निवडणूक ही स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष साठे म्हणाले आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद ,पंचायत समित्या निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना- काँग्रेस या पक्षाशी युती करणार नसून ही निवडणूक आपण स्वतंत्र लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली . आगामी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.