येस न्युज मराठी नेटवर्क । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनाही करोना चाचणी करण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो”.