सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या काचेवर दगड मारुन तोडफोड करण्याचा प्रयत्न दोन इसमांनी केला आहे. रामलाल चौकातील कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचं बोलले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती. गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.