सोलापूर : राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष पदी संतोष पवार तर कार्याध्यक्ष पदी जुबेर बागवान यांची निवड जाहीर करून नियुक्तीपत्र दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्षाची ताकद वाढवावी आणि अजितदादा पवार यांचे हात बळकट कराल असा विश्वास व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..
