येस न्युज मराठी नेटवर्क । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून अमली पदार्थविरोधी पथक कृतीशील ९एनसीबी) झाल्याचं दिसत आहे. शनिवारी ( २१ नोव्हेंबर) सकाळी एनसीबीच्या पथकानं प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी धाड टाकली. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. एनसीबीच्या मुंबईतील झोनल पथकाने ही कारवाई केली आहे. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केली.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं. या प्रकरणात आतापर्यंत कलाविश्वातील अनेक दिग्गजांची नाव समोर आली आहेत. यात रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल त्याची प्रेयसी गॅब्रीएला यांचीदेखील यापूर्वी एनसीबीने चौकशी केली आहे.