No Result
View All Result
- सोलापूर – मकर संक्रांती दिवशी अनेक जण पतंग उडवन्याची वर्षानुवर्षांपासून परंपरा सुरू आहे. मकरसंक्रांतिच्या निमित्ताने अबालवृद्ध पतंगबाजीचा आनंद घेताना दिसतात. पतंग उंच जावा आणि त्याची दोरी कट होऊ नये म्हणून स्पर्धेपोटी नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. मात्र बाजारात जेव्हापासून चायनीज मांजा दाखल झाला तेंव्हापासून अनेक दुर्घटना घडायला सुरुवात झाली. हाच मांजा दरवर्षी शेकडो पक्षांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशभरात या प्राणघातक चायनीज नायलॉन मांजामुळे आजपर्यंत अनेक पशु पक्षांसह नागरिकांनीही प्राण गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात सुद्धा अशा घटना घडताना पाहायला मिळतात. अनेकजण बंदी असूनही नायलॉनचा मांजा विकून दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालत आहेत.
- मकर संक्रांतीच्या दरम्यान, दरवर्षी ६०-७० पक्षांचा मांजामध्ये अडकून मृत्यू होतो अशी आकडेवारी सांगते. पोपट, वटवाघोळ, कोकीळ, घुबड, राखी धनेश, बगळा, कबुतर, घार हे पक्षी मांज्यात अडकून गंभीर जखमी होतात. त्यांचा आकडा दरवर्षी हा २०० ते ३०० असल्याचे आकडे समोर येत आहेत. नायलाॅन मांजा पेटत्या विद्युत ताराला अडकल्याने करंट लागूनही प्राण गेले आहेत. जनावरांच्या पोटात जाऊनही मृत्यू होतो, अशा घटनांची नायलाॅन मांजाचे कारण म्हणून नाेंद हाेत नाही. न्यायालयाच्या बंदीनंतर सुद्धा पक्ष्यांसोबतच मागील १५ वर्षात राज्यात नायलाॅन मांजाने गळा कापल्याने १५० ते २०० लाेकांचा जीव गेला आहे. शासन-प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही नायलॉन मांजावरची बंदी कुचकामी ठरली आहे. त्यामुळे आता पर्यावरणप्रेमींनी सजग होऊन नायलॉन मांजा न वापरता कॉटनचा मांजा वापरण्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे आवाहन वाईल्डलाईफ कॉंझर्वेशन असोशिएशन, सोलापूर या पर्यावरण संस्थेतर्फे करण्यात येत आहे.
No Result
View All Result