नवी दिल्ली : नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं याप्रकरणी निकाल दिला. नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला असून नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणी वेगवेगळ्या न्यायालयांत सुनावणी चालू होती. मात्र आता ही सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयानं आज आपला निर्णय जाहीर केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणाचं निकाल वाचन केलं जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नवनीत राणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. नवनीत राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झालं होतं. त्यानंतर उच्च न्यायालयातील अनेक तारखांना नवनीत राणा आणि त्यांचे वडिल गैरहजर राहिले होते.