नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई-विरार अशा विविध परिसरातून भूमिपुत्र सिडको भवन परिसर तसेच नवी मुंबई महानगरपालिका परिसरात दाखल झाले आहेत. मात्र यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते ठाण्यातील बाळकुंभ पाडा येथील सई पाटील या चिमुरडीने.नऊ वर्षाची सई जवळपास ३० किलोमीटर सायकल चालवत आंदोलनात सहभागी होण्यासाठी आली आहे. दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचे आवाहन करण्यासाठी ती आंदोलनात सहभागी झाली आहे.