जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांचे मार्फत दि.10/05/2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करणेत आले आहे. सदर लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे 1000 मिळकतदारांची प्रकरणे तडजोडी करीता दाखल करण्यात आलेली आहेत. दाखल प्रकरणनिहाय मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांचेमार्फत संबंधित मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
लोक अदालतमध्ये मिळकतदारांच्या थकबाकीतील नोटीस फि, वॉरंट फि व शास्ती ची जी रक्कम आहे त्यामधील 50% रक्कम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची “ड” प्रकरण 8 कराधान, नियम 51 मधील तरतुदीनुसार सुट देण्यात येणार आहे. सबब जास्तीत जास्त् मिळकतदारांनी सदर सवलतीचा लाभ आयोजित लोक अदालत च्या माध्यमातून घ्यावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.
तसेच ज्या मिळकतदारांना नोटीसा प्राप्त् झाल्या नाहीत असे मिळकतदार तसेच यापुर्वी मागील लोक अदालतमध्ये ज्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत तथापी त्यांना त्यावेळी थकबाकी भरता आलेली नाही अशा सर्व मिळकतदारांना तसेच ज्यांना नोटीसा प्राप्त नाहीत परंतू थकबाकी भरावयाची आहे अशा सर्व मिळकतदारांनीही शनीवार, दि.10/05/2025 रोजी मिळकत कर विभागाकडील संबंधित कर निरिक्षक यांना संपर्क साधून 50% शास्ती माफीचा लाभ घेऊ शकतात. तसेच ज्यांना प्रत्यक्ष येणे शक्य नाही त्यांनी ऑनलाईन, कोणत्याही पेमेंट गेटवेव्दारे (उदा. फोनपे, गुगलपे इ.) चालू आर्थिक वर्षाच्या मालमत्ता करास देण्यात येत असलेल्या 6% सुटीसह थकबाकीवरील शास्तीमध्ये देण्यात येत असलेल्या 50% सुटीचा लाभ घ्यावा.
शनीवार दि. 10/05/2025 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथील मिळकत कर भरणा केंद्र चालू राहणार आहे.