• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, April 15, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भारती विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस येथे राष्ट्रीय कॉन्फरन्स यशस्वी

by Yes News Marathi
April 9, 2026
in इतर घडामोडी
0
भारती विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस येथे राष्ट्रीय कॉन्फरन्स यशस्वी
0
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, -: भारती विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस, सोलापूर येथे “उच्च शिक्षणातील गुणवत्ता आश्वासन: शैक्षणिक उत्कृष्टता आणि उद्योगसिद्धतेतील दुवा” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्सचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कॉन्फरन्समध्ये देशभरातून साठहून अधिक संशोधकांनी सहभाग नोंदवून आपले संशोधन सादर केले. उच्च शिक्षणातील गुणवत्ता, विद्यार्थ्यांची कौशल्यविकास प्रक्रिया आणि उद्योगाच्या अपेक्षा यांमध्ये समन्वय साधण्यावर या परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली.कॉन्फरन्सचे उद्घाटन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे प्राचार्य डॉ. एस. डी. नवले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सोनी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वासंती ऐयर तसेच एस सॉफ्ट स्किलचे संचालक डॉ. एम. एस. देशपांडे प्रमुख उपस्थित होते.

उद्घाटन सत्रात मान्यवरांनी उच्च शिक्षणाच्या बदलत्या गरजांवर भाष्य करताना गुणवत्ता आश्वासनाची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी अभ्यासक्रम, प्रशिक्षण व उद्योग सहकार्य यावर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली.कॉन्फरन्सदरम्यान विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते, डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटीच पुणेचे डायरेक्टर अँड हेड ऑफ रिसर्च डॉ रोशन काझी याना निमंत्रित करण्यात आले होते ज्यामध्ये संशोधकांनी आपले विचार व निष्कर्ष मांडले. या परिषदेमुळे संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना ज्ञानविनिमयाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इन्स्टिटयूटचे संचालक, प्रा.डॉ. एस बी सावंत कॉन्फेरेंन्सचे समन्वयक डॉ.ए.बी. नदाफ डॉ.डी. डी. म्हेत्रे आणि प्रा, नीलिमा मोंढे , प्राध्यापक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

मौजे कोंडी, बीबी दारफळ येथे अवैध गौण खनिज कार्यवाहीत 6 हायवा व 1 पोकलँड जप्त

Next Post

कसबा गणपती मंडळ समाजसेवेचे आदर्श उदाहरण – डॉ. खा. ज्योती वाघमारे

Next Post
कसबा गणपती मंडळ समाजसेवेचे आदर्श उदाहरण – डॉ. खा. ज्योती वाघमारे

कसबा गणपती मंडळ समाजसेवेचे आदर्श उदाहरण – डॉ. खा. ज्योती वाघमारे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In