नाशिक – नाशिकमधील आनंदवली पाईपलाईन रोड परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात केवळ आठ वर्षांची नविका अभिषेक नेरकर हिचा जागीच मृत्यू झाला आहे.
.या धडकेत ती गंभीर जखमी झाली असून घटनास्थळीच तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर सतत वेगाने वाहनांची वर्दळ असते, मात्र वाहतूक नियंत्रणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.
पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.