येस न्युज मराठी नेटवर्क ; अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ च्या रोव्हरने भारतीय वेळेनुसार शुक्रवारी मंगळावर यशस्वीपणे लँडिंग केले. जवळपास सात महिन्यांपूर्वी या रोव्हरने पृथ्वीवरून उड्डाण केले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री दोन वाजून २५ मिनिटांच्या सुमारास Perseverance रोव्हरने मंगळावर लँडिंग केले. रोव्हर मंगळावर उतरल्यानंतर नासाने पहिले छायाचित्र जारी केले. अंतराळ संशोधनाच्यादृष्टीने ही मोहीम महत्त्वाची समजली जाते.