संगमेश्वर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भोवली आहे. कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर राणेंना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. दिवसभर हे अटक नाट्य आणि आरोप-प्रत्यारोप सुरू होते. नेमकं कधी काय झालं? यावर टाकलेला हा प्रकाश.
किती वाजता काय घडले ?
10.30: नाशिक पोलीस आयुक्त हा राष्ट्रपती की पंतप्रधान? आमचं पण सरकार वर आहे : नारायण राणे
10.54 : राणे म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान, आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणतात, ते कोर्टात सांगा
11.30 : तळकोकणातून पहिला हुंकार, नारायण राणेंची रॅली रोखण्याचा इशारा
11.43 : वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेचा एल्गार, राणेंच्या घराबाहेर धुमश्चक्री
12.34 : नाशिक पोलिसांचा प्लॅन बदलला, राणेंना चिपळूणमध्ये अटक करणार नाही!
1.31 : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, राणेंच्या वक्तव्याचं समर्थ नाही, पण त्यांच्या पाठी उभे राहण्याच केले स्पष्ट
2.04 : राणेंच्या जुहु बंगल्यासमोर युवासैनिक, शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले, चार शिवसैनिक जखमी
2.15 : राणेंना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांकडे वॉरंटच नाही, प्रमोद जठार यांचा दावा
2.21 : नारायण राणे यांना अटक
3.40 : नारायण राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले