येस न्युज मराठी नेटवर्क : नाना पटोले यांनी अखेर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. दरम्यान, नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची धुरा सोपवली जाणार हे जवळपास निश्चित असून पक्षश्रेष्ठींकडून यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच पटोले यांनी तातडीने आज आपला राजीनामा सोपवल्याचे सांगण्यात येत आहे. नाना पटोले यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पटोले यांनी नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.