सोलापूर : काँग्रेस शहर युवक अल्पसंख्यांचे अध्यक्ष नजीब भाई शेख यांचा माजी गृहराज्य मंत्री सिद्धरमप्पा म्हेत्रे यांनी सत्कार केला. नुकतेच प्रियंका हॉटेलचे मालक नजीब भाई शेख यांना युवक अल्पसंख्यांक शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नजीब शेख यांना शुभेच्छा देण्याकरिता माजी गृहराज्य मंत्री सिद्धरमप्पा म्हेत्रे यांनी प्रियांका हॉटेलला भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
तसेच त्यांनी नुकतेच ३०० लोकांना अजमेरला घेऊन जाऊन काँग्रेस पक्षासाठी अल्लाह चरणी दुवा केली. त्याचे कौतुक करून सिद्धरमप्पा म्हेत्रे व माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी हार घालून त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी माजी गृहराज्य मंत्री सिद्धरमप्पा म्हेत्रे, माजी महापौर संजय हेमगड्डी, समीर शेख, नागनाथ कोसलकर, किरण शिंदे, किरण चव्हाण, अरबाज मोहोळकर, तला हा मुल्ला आधी उपस्थित होते.