नागपुरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा (Yellow Alert) देण्यात आला आहे. नागपुरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुरात रात्री १०६ मिमी पावसाची हवामान खात्याने नोंद केली आहे. रात्री अचानक आलेल्या पावसाने सर्वत्र पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या घरात पाणीत शिरले आहे. प्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहीर केली.
43 इंच टीव्हीवर उत्तम ऑफर- फिचर्स आणि आकारातही सरस
नागपुरात मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक खोल भागात पाणी शिरले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. हवामान विभागाने नागपुरात आधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. खरं तर इथे अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसे,च विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा (येलो इशारा) देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता होती. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर नागपुरात पाऊस सुरूच होता. मात्र, रात्री या पावसाचा जोर वाढल्याने अंबाझरी तलाव ओसंडून वाहत होता. नागपुरात गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण होते. अनेक वाहने आणि घरातील सामान पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे.