No Result
View All Result
- नागेश करजगी ऑर्किड स्कुलच्या ‘दस साल बेमिसाल’ संकल्पनेनुसार आधारित “रिदम २०२३” स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी शाळेला १० वर्षे व संस्थेचे अध्यक्ष कुमार दादा करजगी यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत असून त्यावर आधारित ‘दस साल बेमिसाल’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात सादर करण्यात आला.
- दि. ४ व ५ फेब्रुवारी रोजी वालचंद शिक्षण संस्था व औद्योगिक संकुलाचे अध्यक्ष अरविंद दोशी, स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, सोलापूर विज्ञान केंद्राचे सल्लागार प्रो. व्ही. जी. गंभीर , संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी विनायक भोसले, संस्थेचे अध्यक्ष कुमारदादा करजगी, सचिवा वर्षा विभूते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, शाळेचे सल्लागार डॉ. बंडोपंत पाटील, शाळेचे माजी संचालक सी. बी. नाडगौडा, माजी प्राचार्या कोमल कोंडा, शाळेच्या प्राचार्या रुपाली हजारे, प्री-प्रायमरी प्राचार्या अनिता अनगोंडा यांच्या उपस्थितीत दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सादर झाले.
- हे स्नेह संमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा आविष्कार नसून शाळेने १० वर्षात घेतलेल्या उत्तुंग भरारीचे सादरीकरण आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष कुमारदादा करजगी यांनी आपल्या मनोगतात माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जगाशी स्पर्धा करता यावी म्हणून इथून पुढच्या काळात त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
- प्री.प्रायमरी विभागाचा अहवाल प्राचार्या अनिता अनगोंडा यांनी सादर केला. प्राचार्या रुपाली हजारे यांनी शाळेच्या दशकपूर्ती वर आपले विचार व्यक्त करताना संपूर्ण १० वर्षातील शाळेची प्रगती आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता याचा अहवाल सादर केला.
- गणेश वंदनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आईचा गोंधळ गीत, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित राजं आलं, पंढरीचा विठुराया, जेजुरीचा खंडेराया,जय जय महाराष्ट्र यावर आधारित लोकनृत्ये सादर केली तसेच राजस्थानी नृत्य,कन्नड गीत,बांबू डान्स, स्कॉटिश आणि रशके कमर सोबत मेड इन इंडिया या गाण्यावर विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक करून कार्यक्रमात बहार आणली.दादा थीम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शाळेची निर्मिती कशी झाली याचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. यावेळी शाळेची विद्यार्थीनी कु.हेतल छाजेर हिस शै. वर्ष २०२२-२३ उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
- या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन अथर्व भुतडा, हेतल छाजेर, दिया पटेल, रिशिका दरगड, हर्ष देशपांडे, श्रावणी गवळी, संस्कृती शिंदे, रोशनी दत्ता,साहिल शेख, संकीत मखना, चिराग सेठिया, सुशील शिवशरण, काव्या कोठारी, श्रद्धा चिडगुंपी, रेवती भोजने, श्वेता साळवे, सिद्धी साठे, श्रुती पाटील या विद्यार्थ्यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिक्षिका शैलजा धुमाळ यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No Result
View All Result