सोलापूर – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, शै.वर्ष २०२२-२०२३ इ.दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात नागेश करजगी ऑर्किड स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. शाळेतील एकूण ५५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यातून गीतांश छाजर याने ९७.६ टक्के गुण मिळवत शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. जान्हवी कल्याणकर हिने ९४.४ टक्के गुण, जयेश जाधव याने ९४.०० टक्के गुण , अनुष्का चौधरी व पूर्वा शेट्टी यांनी ९३.४ टक्के गुण, हेतल छाजर ९२.६ टक्के गुण मिळवत अनुक्रमे शाळेतून द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकावला. तसेच २० विद्यार्थी विशेष श्रेणी व २५ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.
शाळेचा मागील वर्षाचा निकाल १००% लागला होता. यंदाही शाळेने १०० टक्के निकाल लावून यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली. सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत नवा उच्चांक निर्माण करून शाळेचा गौरव वाढविला. सर्व विद्यार्थ्यांवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्रीकांत जोशी, राजेश्वरी शिरकनहळ्ळी, तहेसीन शेख, अनुजा वाघमारे, इम्रान सय्यद, स्वाती कोकाटे, तुलसाश्री चितारी, अमित वाले, आनंद लिगाडे आदी शिक्षकांचे व ग्रंथपाल कविता श्रीगादी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार करजगी व सचिवा सौ. वर्षा विभूते, व्यवस्थापक श्री. अक्षय चिडगुंपी, प्राचार्या सौ. रूपाली हजारे, पूर्व प्राथ. विभाग प्रमुख सौ. अनिता अनगोंडा यांनी अभिनंदन केले.