सोलापुर : येथील रोहिणी नगर – १ मध्ये सुयोध कन्नड युवक संघाच्या विद्यमाने रविवार, १० ऑक्टोबर रोजी श्री ईश्वरलिंग देवस्थानच्या प्रांगणात नाडहब्ब महोत्सव संपन्न झाला. नाडदेवी प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संस्कृती वळसंगकर, के.एन.हुगार, सो.म.पा.चे मुख्य आरोग्य अधिकारी नेताजी भडंगे, उपाध्यक्ष शिंदीबंदे उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात अध्यक्ष के. एन. हुगार यांनी संघाच्या कार्याबद्दल माहिती दिली. लॉकडाऊनच्या काळात जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात समाजोपयोगी कर्तव्य बजावणाऱ्या १७ कोविड योद्ध्यांचे प्रमाणपत्र, प्रमाणपत्र, श्रीफळ, छोटीशी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना संगीता गौडगाव कालदे, स्वामी, राजशेखर हुगार यांनी आभार मानले. अल्पोपाहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी संतोष डुम्मनवर, संगमेश वालीकार, राजशेखर कोरळ्ळी, श्रावण हेब्बाळ, सुरेश बिराजदार, अंगडी यांनी परिश्रम घेतले.