मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांचे जाणे हे आमच्यासाठी अपरिमित नुकसान,” अशी भावूक प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज (16 मे) कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
राहुल गांधी यांचे ट्वीट
“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.