सोलापूर : दुर्लभ सुंद्रीवाद्या कला अकादेमी सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक कार्य संचनालय, संगीत नाटक अकादेमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 व 21 सप्टेंबर 2025 रोजी संगीत प्रतिभा महोत्सव आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पंडित भिमण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सायं- 6:00 वाजता लोकमान्य टिळक सभागृह एंपी थिएटर हिराचंद नेमचंद वाचनालlय किल्ला बागे समोर महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक बिभिषण चवरे, प्रा.सिद्धेश्वर अप्पासाहेब खुबा,डॉ. विजयकुमार शिरवाळ डॉ. किरण जोशी, पंडित गुरुनाथ जाधव, गोरखनाथ जाधव यांच्या हस्ते संगीत प्रतिभा महोत्सवाचे उद्घाटन होईल यावेळी महोत्सवाची सुरूवात पाचव्या पिढीचे बाल कलाकार मास्टर व्यंकटेशकुमार जाधव, कु.कलाश्री जाधव यांच युगलं सुन्द्री वादन होईल यांना श्रेयश कंगळे तबल्यावर साथ करतील. एक भारतीय बहुमुखी गायिका डॉ. वृषाली देशमुख याचं शास्त्रीय गायन होईल त्यांना संवादिनी साथ – शशिकांत देशमुख तर तबला – नितीन दिवाकर सहकलावंत म्हणून साथ करतील. तसेच यावेळी मध्यप्रदेशचे भोपाळ येथील निनाद अधिकारी याचं संतूर वादन होईल सहकलावंत म्हणून धारवाडचे मल्लेश होगार देसाई कल्लूर हे तबला साथ करतील. जगविख्यात कलाकार दिल्लीच्या राऊंद्री सिहं याचं ओडिसा नृत्य सादर होईल.
रविवार दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी – 9:00 वाजता. सोलापूर जिल्हा वृद्ध कलावंत नियोजन समितीतील सदस्यांचा सत्कार सोहळा होईल तदनंतर अंतरराष्ट्रीय कलावंत पंडित रुद्रेश बंजत्री याचं सनई वादन होईल त्यांना पंडित मनमोहन कुंभार तबला साथ करतील.ग्वाल्हेर घराण्याच्या जेष्ठ गायिका पं. शुभदाताई पराडकर यांची शिष्या अदिती कोरटकर याचं शास्त्रीय गायन होईल त्यांना पंडित मनमोहन कुंभार तबला साथ तर राजकुमार सावळगी हे संवादिनी साथ करतील. आंतराष्ट्रीय किर्तीचे हार्मोनियम वादक ज्ञानेश्वर सोनवणे व शुभदा गायकवाड यांचे संवादिनी युगलं वादन होईल. त्यांना धारवाडचे मल्लेश होगार देसाई कल्लूर हे तबला साथ करतील. मुबंई येथील अंतरराष्ट्रीय कलावंत दिशा देसाई याचं कथक नृत्याने कार्यक्रमाचे समारोप होईल. साकव फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील या संपूर्ण संगीत महोत्सवाचे सुत्र संचालन करतील. हे दोन्ही दिवसाचे कार्यक्रम लोकमान्य टिळक सभागृह एम्पी थिएटर हिराचंद नेमचंद वाचनालंय किल्ला बागे समोर सोलापूर येथे होत आहे शनिवार दिनांक २० संप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता व रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता हा संगीत महोत्सव आयोजित केला आहे.हा महोत्सव सर्वांसाठी खुला व विनाशुल्क आहे तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन दुर्लभ सुंद्रीवाद्या कला अकादेमी अध्यक्ष पंडित भिमण्णा जाधव यांनी केले आहेत.या महोत्सव पार पडण्याकरिता गायत्री जाधव, निलेश कुलकर्णी,मनोजकुमार कगळे संतोष कोथळीकर, पंडीत गुरुनाथ जाधव, गोरखनाथ जाधव, यश कलशेट्टी, वीर चव्हाण, प्रेम चव्हाण, सिद्राम जाधव, मास्टर व्येकटेशकुमार जाधव, कलाश्री जाधव, श्रुती मैंदर्गीकर, अनुग्रह हलकुडे हे परिश्रम घेत आहेत.