सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर आणि अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या शुभ हस्ते शनिवारी सकाळी Yes News Marathi च्या पर्यावरण पूरक गणरायाची पूजा करण्यात आली. यावेळी शिवानंद जाधव, गिरीश गोरे, ह.भ.प इंगळे महाराज ,मनपा आयुक्त पी. शिवशंकर, शिवाजी सुरवसे, विजय आवटे, राजेश भोई,अनिकेत पाटील, उपस्थित होते. यावेळी येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी पी. शिवशंकर यांची मुलाखत घेतली. सायंकाळी पाच वाजता आपल्याला ही मुलाखत युट्युब वर सविस्तर पाहता येईल.