सोलापूर — केंद्र शासनाच्यावतीने अमृत दोन अभियानाशी संबंधित कामाचा अनुभव असलेल्या मुख्यत्वे करून दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचे नामनिर्देशन केंद्र शासनास कळविण्याबाबत सूचित केल्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यरत अधिकारी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त मा. शीतल तेली – उगले व कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी आपला चार्ज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिला असल्याचे समजले.
सदरचा दौरा हा दिनांक 28 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलिया येथे होणार असून “Supporting Water Security Resilence and Transitioning to Circular Cities” या विषयावरील अभ्यास दौरा असणार आहे. महाराष्ट्रातील या दोन महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त देशातील इतर 14 अधिकाऱ्यांसह अशा एकूण 16 अधिकाऱ्यांचा सदर दौऱ्यामध्ये समावेश आहे.
सदर दौरा हा प्रामुख्याने ऑस्ट्रेलियातील सिडने व ॲडलेड या शहरामध्ये होणार असून, सदर दौऱ्याचा संपूर्ण खर्च हा ऑस्ट्रेलियन सरकारतर्फे करण्यात येणार आहे. सदर अभ्यास दौऱ्यात प्रामुख्याने पाणीपुरवठा व मलजल व्यवस्थापन या व या संबंधाने अनुषंगिक बाबींबाबत चर्चा व प्रेझेंटेशन होणार आहे.