पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृह, विभागीय कार्यलय 6 व 7, जन्म मृत्यू विभागासा मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी भेट देऊन केली पहाणी…
सोलापूर — पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृह येथे आज आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे,विभागीय अधिकारी हिदायत मुजावर, विभागीय अधिकारी जावेद पानगल,नियंत्रण अधिकारी डाॅ. ज्योत्स्ना कोरे,डाॅ.अरुंधती हराळकर,डाॅ. दीपिका चिचोळी, तन्वगी जोग, डॉ.मंजिरी कुलकर्णी डाॅ. चाफळकर ,डाॅ. प्रसाद कुमार ,डाॅ. मिनल चिडगुपकर, क्षमा डबीर, संगिता गुरव मेट्रन आदी मन्यावर उपस्थिती होते.प्रस्तुती गृह येथे अद्ययावत व सुसज्य शस्त्रक्रिया गृह व शस्त्रक्रियेकरिता लागणारी सर्व अद्ययावत उपकरणे यामध्ये शस्त्रक्रिया टेबल,प्रसुती टेबल,ऑटोक्लेव्ह शाडोलेस लॅम्प,स्क्रबर, गिजर,उपलब्ध करुन देण्यात आलेले असून याकरिता स्वतंत्र व सुसज्य प्रसुतीगृह, प्रसुत पश्चात नवजात शिशु करिता स्थिरीकरण कक्ष, जोखीमग्रस्त व अति गंतागुंतीच्या गरोदर मातांकरिता अतिदक्षता विभाग तसेच प्रसुतपूर्व तपासणीकरिता येणा-या गर्भवती मातांना सुसज्य प्रतिक्षालय तसेच प्रसुत पूर्व तपासण्या यामध्ये सोनोग्राफी, प्रयोगशाळा तपासण्या इ. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

प्रसुतीगृहाकरिता 24 तास विद्युत सेवा उपलब्ध आहे. रुग्णांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची, अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था व रुग्णांना उद्वाहन (लिफट) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या प्रसुतीगृहामध्ये महिलांकरिता व गरोदर मातांकरिता महिलांच्या आरोग्य विषयक सेवांची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.याच सोबत प्रसुतीगृहात दाखल होणा-या मातांना वरील सर्व सुविधा मोफत देण्यात येत आहे. प्रसुतीकरिता दाखल मातांना शासनाकडून मोफत आहार उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


तसेच मदर तेरेसा हॉस्पिटल येथे भेट दिले त्या ठिकाणी नव्याने कान,नाक,घसा व दंत,त्वचा विभाग सुरु करण्यात आले आहे.मोफत मोती बिंदू ऑपरेशन त्याच बरोबर क्षय रोग विभाग असे विविध सुविधा या ठिकाणी देण्यात येत असून आजून चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा महिलांना देण्यात यावे असे सचुना मा.आयुक्त यांनी संबंधिती अधिकारी यांना दिले. त्यानंतर मा आयुक्त यांनी विभागीय कार्यलय 6 व 7, जन्म मृत्यू विभागासा भेट देऊन त्या विभागाची सविस्तर माहिती घेतली.