सोलापूर अल्ट्रा आझादी रन 2025 ,पर्व 4
“रन फॉर नेशन” – सोलापूरचा ऐतिहासिक उपक्रम..
सोलापूर : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपल्यानंतरही देशभक्तीची ज्योत अखंड तेजोमय ठेवत, चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूरतर्फे यावर्षी ७८ किमी अल्ट्रा रनिंगचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. “रन फॉर नेशन” या घोषवाक्याखाली आयोजित या पर्व-४ मधील धावण्याचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू होऊन १५ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत सलग १२ तास धावून पूर्ण करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पूजा लॉन, सिद्धेश्वर वनविहारजवळील पोदार स्कूल परिसरातून झाली. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता समारोप झाला.
कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार व जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. आज समारोप सोहळा १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता सोलापूर महानगरपालिका येथे ध्वजारोहणा नंतर ७८ किमी धाव पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटूंचा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धावपटूंनी देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन केलेली ही ऐतिहासिक कामगिरी उपस्थित नागरिकांनी उभे राहून दाद दिली.यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त तैमूर मुलाणी, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर,मुख्य लेखापरीक्षक रूपाली कोळी,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त पंडित, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, आरोग्य अधिकारी राखी माने आदी मन्यावर उपस्थिती होते.या उपक्रमाचे आयोजन चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांनी केले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूर शहराची देशभरात देशभक्तीपूर्ण आणि खेळाडूवृत्तीची ओळख आणखी मजबूत झाली आहे.यावेळी संस्थेचे प्रमुख अतिश शहा आणि चंद्रशेखर गायकवाड आदी मान्यवर उपस्थिती होते.




