• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ; धनंजय मुंडे

by Yes News Marathi
November 7, 2020
in मुख्य बातमी
0
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ; धनंजय मुंडे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीचा लाभ आता ऑनलाइन किंवा कॅम्पस पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन घेतला आहे. परदेश शिष्यवृत्तीच्या पात्र २१ विद्यार्थ्यांची दुसरी यादीही शुक्रवारी सामाजिक न्याय विभागामार्फत शासन आदेश जारी करून जाहीर करण्यात आली आहे.

अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या २७ जून २०१७ च्या सुधारित नियमावलीनुसार परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेत पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा अशी अट होती. कोविड-१९ च्या महामारीच्या जागतिक प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी भारतात राहूनच ऑनलाइन शिक्षण घेत होते व असे विद्यार्थी संस्थेत पूर्णवेळ प्रवेशित नसल्याने शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित होते.

म्हणूनच विशेष बाब म्हणून, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून कोविडचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत किंवा संबंधित विद्यापीठ प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत भारतात राहून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना एक विशेष बाब म्हणून विद्यापीठाची फी मंजूर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंडे यांनी घेतला आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीत जे विद्यार्थी परदेशात राहून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत त्यांनाही लाभ देण्याबाबत मुंडेंच्या निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागानं एका पत्रकाद्वारे समाज कल्याण आयुक्त यांना निर्देश दिले आहेत.

Previous Post

अर्णब गोस्वामींचा कारागृहातील मुक्काम वाढला

Next Post

इस्रोची यावर्षीची पहिली मोहीम; आज अंतराळात पाठवणार १० सॅटलाईट

Next Post
इस्रोची यावर्षीची पहिली मोहीम; आज अंतराळात पाठवणार १० सॅटलाईट

इस्रोची यावर्षीची पहिली मोहीम; आज अंतराळात पाठवणार १० सॅटलाईट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group