मुंबई : प्रसिद्ध स्टँडअप कॉमे़डियन मुनव्वर फारूकी सासत्याने एक चर्चेचा विषय असतो. नुकतचं मुनव्वर फारूकीचा दिल्लीतील शो रद्द करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या परवाना युनिचटने मुनव्वरची शोला परवानगी देण्याची विनंतीस स्पष्ट नकार दिला आहे. 28 ऑगस्ट रोजी दिल्लीतील सिविक सेंटरमध्ये त्याच्या शोचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या शोला विश्वू हिंदू परिषदेने विरोध दर्शववा होता, त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी मुनव्वर फारुकीचा शोस नकार दिला आहे.
विश्व हिंदू परिषदेने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून मुनवरचा शो रद्द करण्याची मागणी केली होती. फारूकीचा शो झाल्यास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सदस्य याला विरोध करतील असे विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या पत्रात म्हटले होते. हे पत्र विश्व हिंदू परिषद दिल्लीचे अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिले आहे.