पाच वेळा आयपीएल जेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स आज आरसीबीसोबत यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. आरसीबी आणि मुंबई या दोन्ही संघ विजयाने सुरुवात कऱण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. पण मुंबईचा संघ पहिला सामना जिंकणार का? आरसीबी मुंबईवर भारी पडणार? याबाबतच्या चर्चेला उधाण आलेय. त्याला कारणही तसेच आहे.. मागील दहा वर्षांत मुंबईला पहिला सामना एकदाही जिंकता आलेला नाही. हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव झालेला आहे. यावर अनेक मिम्स अन् फोटो व्हायरल होत आहे. पंरपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन असे म्हणत अनेकांनी मुंबईचा संघ पहिला सामना हरु शकते.. असेच म्हटलेय. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईलाही त्यांच्या चाहत्यांचा पाठिंबा आहे. मुंबईचे चाहते पहिला सामना देवाला.. असे म्हणत आरसीबीच्या चाहत्यांना हिनवत आहेत.
आरसीबीचा संघ आजच्या सामन्यात आपले वर्चस्व कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दोन्ही संगात झालेल्या मागील पाच सामन्यात आरसीबी सरस ठराली आहे. पाच सामन्यात आरसीबीने तीन वेळा विजय मिळवला आहे. तर मुंबईला दोन वेळा विजय मिळवता आला आहे. आजचा सामना जिंकून आरसीबी विजयाने सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. तर मुंबईचा संघ आपली कामगिरी सुधारण्यासाठी मैदानात उतरेल.
2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. जवळपास 10 हंगमापासून मुंबईने सातत्याने पहिला सामना गमावला आहे. यंदा मुंबई आपला नकोसा विक्रम मोडणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.