सोलापूर – आनंदी आणि आरोग्यमय जिवनासाठी नियमित योगासने करणे आवश्यक आहे. आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आरोग्याची काळजी घेणेचे स्मरण करुन देतो. योगाच्या शास्त्रीय माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे मल्टीमिडिया प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी आज येथे केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, योग दिवस समन्वय समिती, हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आणि जिल्हा व पोलिस प्रशासन यांच्यावतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात आयोजित दोन दिवसीय मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयुक्त एम राज कुमार प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.मंचावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, मुख्याध्यापिका दीपा फाटक, पोलीस निरीक्षक अजित लकडे, पर्यवेक्षक भानुदास बनसोडे, मनमोहन भुतडा, रोहिणी उपळाईकर, बाळासाहेब पाटील, सतीश घोडके, उद्योजक विरेश नसले, प्रभा कोडगे, अक्षय गवळी आणि सारिका अनपट आदी उपस्थित होते.
आयुक्त राज कुमार म्हणाले, योग आता केवळ ऋषी-मुनींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एक सार्वत्रिक जीवनशैली बनला आहे. योगाचे फायदे ओळखून, तो मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जात आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ही संकल्पना आहे. आपले कुटूंब हे संपूर्ण पृथ्वी आहे. आपण या सगळया कुटूंबाची काळजी घेतली पाहिजे. योग आजच्या दिनापुरता मर्यादित न राहता सर्वकाळ निरंतर करावा. असेही आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्य शासनाकडून विविध माध्यमाद्वारे योग विषयक मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार होत असल्यामुळे योगाची माहिती प्रत्येक घराघरात पोहचत आहे. केंद्रीय संचार ब्युरोने मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातुन लोकांना आरोग्याबाबत दक्ष केले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुनिल सोनटक्के यांनी केले.श्रीमती पाठक म्हणाल्या, शासनाच्या प्रत्येक उपक्रमात हरिभाई देवकरण प्रशालेचा सक्रीय सहभाग असतो. योग गुरु भुतडा आणि रोहिणी उपळाईकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सामान्य लोकांना योगाबद्दल माहिती व्हावी यासाठी मल्टीमिडियाच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शहरातील शालेय विदयार्थी महाविदयलयीन युवक व ज्येष्ठ नागरिक यांनी प्रदर्शनाला भेट दयावी. हे प्रदर्शन भारतीय प्राचीन योगाची माहिती देणारे आहे. यामध्ये प्रार्थना, पूरक हालचाली मानेच्या, योगासने उभी, बैठक, पाटीवरील, पोटावरील, प्राणायाम, ध्यान आदीबाबत माहिती मिळणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अंबादास यादव यांनी प्रास्ताविकेतून केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. सूत्रसंचालन आणि आभार प्रमोद चुंगे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे भाऊसाहेब चोरमले, साईराज राउळ, योगीराज कोंडाबत्तीन, पियुष बनसोडे, किरण गवळी आदींनी परिश्रम घेतले.

