येस न्युज नेटवर्क : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधून मुलायम सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर देखरेखीसाठी वैद्यकीय समिती नेमण्यात आली आहे. शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन मोदींनी अखिलेश यादव यांना दिल्याची माहिती आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुलायमसिंह यादव यांना 26 सप्टेंबरपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती रविवारी अधिकच खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले. संसर्ग संपूर्ण शरीरात पसरला असून त्यांची ऑक्सिजन पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर देखरेखीसाठी वैद्यकीय समिती नेमण्यात आली आहे.