नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी निवृत्तीनंतर काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. लॉकडाऊनदरम्यान धोनी शेतात मेहनत करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता धोनी कुक्कुटपालनाकडेही वळला आहे. धोनी आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये कडकनाथ कोंबड्या पाळणार आहे. रांचीमधील आपल्या फार्म हाऊसमध्येच कुक्कुटपालन करणार आहे.
मध्य प्रदेशच्या एका पोल्ट्री फॉर्ममध्ये याची ऑर्डर देण्यात आला आहे. 15 डिसेंबरपर्यंत 2000 कडकनाथ पिल्लांची ऑर्डर पूर्ण करायची आहे. झाबुआ जिल्ह्याच्या थांडला ब्लॉकमध्ये राहणाऱ्या विनोद मेधा यांना याची ऑर्डर मिळालं आहे. त्यांनी सांगितलं की, “त्यांना तीन महिन्यांपूर्वी धोनीच्या फार्म मॅनेजरकडून त्यांच्याशी संपर्क केला होता. पाच दिवसांपूर्वी 2000 पिल्लांची ऑर्डर मिळाली आहे. ती 15 डिसेंबरपर्यंत रांचीला पोहोचवायची आहे.” “भारताच्या प्रसिद्ध क्रिकेटरपैकी एक असलेल्या धोनीच्या फार्ममध्ये मी कडकनाथ पक्षी पुरवणार असल्याचा मला अभिमान आहे, असंही ते म्हणाले