सोलापूर : मृदुंगाचार्य मारुती काशिनाथ लोंढे ऊर्फ बाबासाहेब लोंढे यांचे आज दि. ०१ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ०५:१० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ज्येष्ठ साहित्यिक ल. सि. जाधव यांचे ते मेहुणे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. ०२ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ०९:०० वाजता त्यांच्या निराळे वस्ती, मुरारजी पेठ, येथील निवासस्थानापासून निघणार असून बाळे येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.