सोलापूर – पुणे विभागातील संसद सदस्य समितीच्या अध्यक्षपदी खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांची एकमताने निवड झाली असून समितीच्या बैठकीत त्यांनी सोलापूर विभागातील रेल्वेच्या समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या.
सोलापूर ‘ विभागातील रेल्वे गाड्यांना काही स्थानकांवर थांबा देणे, मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेच्या वेळेत बदल करणे, अमृत भारत योजनेंतर्गत अक्कलकोट रोड व मोहोळ रेल्वे स्थानकाचा समावेश करणे, तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम लवकर पूर्ण करणे, ‘सांगोला-मंगळवेढा- सोलापूर नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणे, दौंड ते कलबुर्गी लोकल शटल सेवा अथवा डेमू रेल्वे सुरू करणे, पंढरपूर वाराणसी नवीन रेल्वे सुरू करणे, सोलापूर-नागपूर गाडी पुन्हा सुरू करावी, हुबळी एक्स्प्रेसचा विस्तार सोलापूरपर्यंत करावा, पंढरपूर-वाराणसी-पंढरपूर गाडी आठड्यातून दोन दिवस सुरू करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश ललवाणी, सोलापूर आणि पुणे विभागातील लोकसभा व सोलापूर-राज्यसभा सदस्य त्याचबरोबर रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.