सोलापूर : सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर युवक शहराध्यक्षपदी सरफराज शेख यांची निवड झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेख यांना पुण्यात निवडीचे पत्र दिले.पक्षाचे युवक शहराध्यक्ष अक्षय वाकसे यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. यादरम्यान पक्षाने कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सरफराज शेख यांच्या निवडीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. नियुक्तीपत्र देताना युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश सचिव ट्रिकल परमार, सचिन नारकर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, गब्बर सय्यद, नूर नदाफ आदी उपास्थित होते.