पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक पुण्यात संपन्न
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे शहर व ग्रामीण, सातारा, व कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पुण्यात झाली.
याबैठकित खासदार प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर मंगळवेढा ही सहा ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कडे घ्यावी तेथे निश्चितच काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
तसेच यावेळी चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी बूथ कमिटी, मतदान नोंदणी, बैठका, पक्षाचे कार्यक्रम आंदोलन या विषयी माहिती दिली.
या बैठकीला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, CWC सदस्य, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, गोवा दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, माजी मंत्री रमेश बागवे, मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा, पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष कैलाश कदम, आ. संग्राम थोपटे, आ. रविंद्र धंगेकर एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख आदि उपस्थित होते.
यावेळी चेन्नीथला यांनी बोलताना आतापर्यंत १२० मतदारसंघातील आढावा घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. संघटन मजबूत करण्याचा हा कार्यक्रम असून जनतेमध्ये जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची माहिती पोहचवण्याचे काम केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने मविआला जसा पाठिंबा दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या बैठकीस सोलापूर शहर जिल्ह्यातून चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीपराव माने, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक संजय हेमगड्डी, महादेव कोगनुरे, मनोज यलगुलवार, आरिफ शेख, रियाज हुंडेकरी, नगरसेवक विनोद भोसले, शिवा बाटलीवाला, मा. नगरसेविका फिरदौस पटेल, मिनलताई साठे, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, अंबादास बाबा करगुळे, सुशील बंदपट्टे, अशोक निम्बर्गी, सुदीप चाकोते, तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, प्रशांत साळे, अमर सूर्यवंशी, राजेश पवार, शालिवाहन माने देशमुख, भारत जाधव, दादा साठे, किशोर पवार, आदित्य फत्तेपूरकर, तिरुपती परकीपंडला, रवी यलगुलवार, शौकत पठाण, भीमाशंकर टेकाळे, राज सलगर, बसवराज म्हेत्रे, मयूर खरात, शफी हुंडेकरी, युवराज जाधव, शकील मौलवी, सातलिंग शटगार, लक्ष्मण भोसले, राहुल वर्धा, राहुल गोयल, राजन कामत, कोमोरो सय्यद, अभिषेक कांबळे, हसीब नदाफ, सचिन गुंड, शाहू सलगर , संदीप सुरवसे, राजकुमार पवार, रुकय्या बिराजदार, राधाकृष्ण पाटील, श्रीशैल रणखांबे, संजय गायकवाड, चंद्रकांत टीक्के, अजिंक्य गायकवाड, हणमंतू रुपणर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.