येस न्युज मराठी नेटवर्क : भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ.जय सिद्धेश्वर महास्वामी यांना जातीचा बनावट दाखला दिल्याच्या संशयावरून तडवळ येथील शिवसिद्ध बुळ्ळा याला मंगळवारी सकाळी गुन्हे शाखेने अटक केली असून त्याची कसून चौकशी चालू आहे. खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याबाबत प्रमोद गायकवाड यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती .
त्यानंतर गायकवाड हे उच्च न्यायालयातही गेले होते .या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते .या आदेशानुसार आता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक अक्कलकोट तालुक्यातील तडवळे येथे रवाना झाले आहे .बुळ्ळा यांनी खासदार डॉक्टर महास्वामी यांचा दाखला प्रवासादरम्यान गहाळ झाल्याची फिर्याद वळसंग पोलिसांकडे दिली होती. बुळ्ळा यानेच दाखला तयार करून दिल्याचं पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने सखोल तपास करण्यासाठी बुळ्ळा याला शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल जात पडताळणी समितीने दिला आहे. त्यानंतर अक्कलकोट तहसीलदारांनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले .सोलापूर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी या संदर्भात पोलिसांनी सखोल तपास करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले .त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तडवळे येथे मंगळवारी सकाळीच रवाना झाले . बुळ्ळा सध्या सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून बुळा याची चौकशी चालू असून त्याच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .या प्रकरणात तो दोषी आहे किंवा नाही याबाबत याबाबत पोलिसांनी अद्याप तरी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. तडवळे येथील शिवसिद्ध बुळ्ळा यांची कसून चौकशी सुरू असून लवकरच या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागतील असा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे.