सोलापूर : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अद्याप दीड वर्ष बाकी असले तरी या निवडणुकीसाठी सोलापूर, पुणे ,नगर जिल्ह्यांतील इच्छुकांनी आतापासूनच जोर-बैठका काढण्यास सुरुवात केल्याने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक किती अटीतटीची सामना होईल, याचा प्रत्यय येऊ लागला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असली, तरी महायुतीत मात्र भाजपच्या जागेवर शिंदेसेनेने डोळा ठेवल्याने ‘शिक्षक’च्या आखाड्यात कोण कोणाची ‘शाळा’ घेणार याचीच उत्सुकता लागली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात गतवेळी काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी अपक्ष दत्तात्रय सावंत व भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून विधिमंडळ गाठले होते. त्यावेळी त्यांना एकसंध राष्ट्रवादीची साथ होती. निवडणूक डिसेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे, तर महाविकास आघाडीत तो काँग्रेसच्या वाट्याला आहे. महाविकास आघाडीकडून सध्या तरी आमदार जयंत आसगावकर हेच लढतील असे चित्र आहे. मात्र, महायुतीत भाजपच्या जागेवर शिंदेसेनेनेही तयारी सुरू केल्याने या जागेवरुन टिस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे जोर-बैठका घेण्यास सुरुवात केली आहे . मतदारसंघ नेमका कुणाच्या वाट्याला जाणार, याबाबत वरिष्ठांनी अद्याप अवाक्षरही काढले नाही.
तसेच मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या सोलापुरात जवळपास शिक्षकांसोबत बैठका सुरु झाल्या आहेत . अशी माहिती स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाची प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ यांनी माहिती दिली आहे..
पुणे मतदार संघाची 2020 ची नोंदणीकृत आकडेवारी
सोलापूर: 32201
पुणे :13584
एकूण: 45785
पुणे मतदारसंघातून उमेदवारांना पडलेली मते..
जयंत आसगावकर :168742 विजयी उमेदवार
दत्तात्रय सावंत (विद्यमान शिक्षक आमदार) : 110243
जितेंद्र पवार : 57954
गोरखनाथ थोरात : 45155
प्रकाश पाटील : 23656
रेखा पाटील : 16897
तानाजी नाईक : 6968
नंदकिशोर गायकवाड : 6439
नितीन पाटील :63710
सुभाष जाधव : 610
शिक्षकांच्या वेळोवेळी अडचणी आम्ही जपल्या आहेत, प्रत्यक्ष शिक्षकांना शाळेत अडचणी येऊ नये म्हणून आम्ही प्रिंटर वाटले आहेत,
शिक्षकांना वेळोवेळी आम्हाला मदत करण्याचा आमचा हेतू आहे , एक कॉल प्रॉब्लेम सॉल असा आमचा नारा आहे.
सोलापूर जिल्ह्यातून शिक्षकांच्या दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक आढावा बैठक घेणार आहे, अशी ही माहिती जयंत आसगावकर यांनी दिली आहे..
रस्त्यावरची लढाई असेल आझाद मैदानावरची भूमिका असेल शिक्षकांच्या अडचणी असतील आम्ही वेळोवेळी वरिष्ठापर्यंत पोहोचवले आहेत.
– जयंत आसगावकर : शिक्षक आमदार पुणे
आपलं काम हेच आपलं गुरु आहे, शिक्षकांनी आमच्या कामाची नोंद घ्यावी, साधारणपणे शिक्षकांची संख्या कोल्हापूर आणि नगर पेक्षा सोलापूर पुणे मतदार संघाची आकडेवारी जास्त आहे , सोलापूर पुणे मतदारसंघातून दोन लाख शिक्षकांचे मतदान आहे, सोलापूर पुणे मतदारसंघातून 60 ते 70 टक्के शिक्षकांचा मतदान होतात.
– दत्तात्रय सावंत माजी शिक्षक आमदार पुणे
