सोलापूर – सोलापूर च्या रे नगर कुंभारी येथे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत निर्माण होत असलेल्या 30 हजार असंघटीत कामगारांचे जगातील एकमेव पथदर्शी व महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाच्या लाभार्थ्यांनी अत्यल्प व्याजदरात राष्ट्रीयकृत बँका मार्फत गृहकर्ज उपलब्ध व्हावे याकरिता अर्ज दाखल केले. त्यानुसार गृहकर्जासाठी सर्व अद्ययावत व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊन गृहकर्ज मंजूर झाले. दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालय येथे लाभार्थ्यांनी सादर केलेले कागदपत्रे त्याची सत्यता पडताळणी व बायोमेट्रिक करून गृहकर्जाची पूर्तता करण्यासाठी शून्य रक्कमेवर बचतखाते उघडून देऊन त्या खात्यातुन कर्जाची परतफेड करता यावी.यासाठी गहाणखत व साठेखत ची प्रक्रीया राबवण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी मा.दक्षिण सोलापूर प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते रे नगर लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून गृहकर्ज पूर्तता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी गोविंद गीते, रे नगर फेडरेशन मुख्य रे नगर फेडरेशन चे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर , नगरसेविका कामिनी आडम, रे नगर फेडरेशन अध्यक्ष नलिनीताई कलबुर्गी, रे नगर फेडरेशन चे सचिव युसूफ शेख मेजर बँक ऑफ महाराष्ट्र चे विभागीय व्यवस्थापक सुनीता भोसले व उप विभागीय व्यवस्थापक हेमंत महाजन रे नगर फेडरेशन चे सदस्य मुरलीधर सुंचू, मेहताब आलम सय्यद, डी.एल.पवार, आदी उपस्थित होते.