• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 11, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील 70 हून अधिक उमेदवार यशस्वी

by Yes News Marathi
May 23, 2023
in मुख्य बातमी
0
यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील 70 हून अधिक उमेदवार यशस्वी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून कश्मिरा संख्ये प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकाविला आहे.

         केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2022 च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. 

(25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडेपाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265). दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे, (517) रोहित करदम, (530) शुभांगी केकण, (535) प्रशांत डगळे, (552) लोकेश पाटील, (558) ऋतविक कोत्ते, (560) प्रतिक्षा कदम, (563) मानसी साकोरे, (570) सैय्यद मोहमद हुसेन, (580) पराग सारस्वत, (581) अमित उंदिरवडे, (608) श्रुति कोकाटे, (624) अनुराग घुगे, (635) अक्षय नेरळे, (638) प्रतिक कोरडे, (648) करण मोरे, (657) शिवम बुरघाटे, (663) राहुल अतराम, (665) गणपत यादव, (666) केतकी बोरकर, (670) प्रथम प्रधान, (687) सुमेध जाधव, (691) सागर देठे, (693) शिवहर मोरे, (707) स्वप्निल डोंगरे, (717) दिपक कटवा, (719) राजश्री देशमुख, (750) महाऋद्र भोर, (762)अकिंत पाटील, (790) विक्रम अहिरवार, (792) विवेक सोनवणे, (799) स्वप्निल सैदाने, (803) सौरभ अहिरवार, (828) गौरव अहिरवार, (844) अभिजय पगारे, (861) तुषार पवार, (902) दयानंद तेंडोलकर, (908) वैषाली धांडे, (922) निहाल कोरे.

एक नजर निकालावर

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी-मे 2023 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 933 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –345, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 72 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 41 दिव्यांग उमेदवारांचा (14 ऑर्थोपेडिकली अपंग, 07 दृष्टीहीन, 12 श्रवणदोष आणि 08 एकाधिक अपंग) समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 89, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 28, इतर मागास वर्ग -52, अनुसूचित जाती- 05, अनुसूचित जमाती-04 उमेदवारांचा समावेश आहे.

                    या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 75, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –45, अनुसूचित जाती (एस.सी.) – 29, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 38 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 04, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 83, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून – 53, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 31, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 473 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 201, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 45 , इतर मागास प्रवर्गातून – 122, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 69 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –36 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 131 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 12 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 33, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 19 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 933 उमेदवारांपैकी 613 पुरुष आणि 320 महिलांचा विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर 101 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल.

अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

Previous Post

पंढरपूर, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

Next Post

सोलापूरचा विक्रमवीर हर्षल साबळेच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतूक

Next Post
सोलापूरचा विक्रमवीर हर्षल साबळेच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतूक

सोलापूरचा विक्रमवीर हर्षल साबळेच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतूक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group