सोलापूर – वारंवार पैशाचा तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अकलूज मधील सावकार राजेंद्र तुकाराम लोहार याला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेची सविस्तर माहिती अशी,की फायनान्स व बँकेकडून कर्ज काढताना मित्राला जामीन होण्यास भाग पाडून त्याचे हप्ते वेळेवर भरले नसल्याने झालेल्या त्रासामुळे तात्या माने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबतची फिर्याद त्यांच्या पत्नी रूपाली माने यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिली होती.आरोपी सावकार राजेंद्र तुकाराम लोहार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे करत आहेत.

