मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाची फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर याप्रकरणी अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काही नेत्यांनी तर नोटांवर फोटो छापण्यासाठी काही पर्यायही सुचवले. याचसंदर्भात राम कदम यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहे. राम कदम यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 500 रुपयांच्या नोटांचे चार फोटो जोडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या फोटोंवर त्यांनी काही महापुरुषांसोबत पंतप्रधान मोदींचाही फोटो राम कदम यांनी लावला आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी 500 रूपयांच्या नोटेवर स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकत एक ट्वीट केलं आहे. तसंच ‘अखंड भारत… नया भारत… महान भारत… जय श्रीराम… जय मातादी’ असंही ट्वीटमध्ये लिहिलं आहे.