येस न्युज नेटवर्क : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटरवर श्रद्धांजली वाहिली. आबेंच्या निधनानंतर मोदी गहिवरले. शिंजो आबे यांच्यावरचा हल्ला धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्य एका ट्विटद्वारे देशभरात उद्या एक दिवसाचा राष्ट्री दुखवटाही जाहीर केला आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. आबे यांच्या निधनानंतर जगभरातील प्रमुख नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांना ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिंजो आबे यांची मैत्री जगजाहीर आहे.