• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना काळातील आपले अपयश झाकण्यासाठी मोदी महाराष्ट्राला बदनाम करत आहेत :- प्रकाश वाले

by Yes News Marathi
February 9, 2022
in इतर घडामोडी
0
कोरोना काळातील आपले अपयश झाकण्यासाठी मोदी महाराष्ट्राला बदनाम करत आहेत :- प्रकाश वाले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना कोरोना काळातील आपल्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडत कोरोना वाढीस महाराष्ट्र जबाबदार आहे असे खोटे बोलून महाराष्ट्राचा अपमान केला. यांच्या निषेधार्थ सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेत्रत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी, मोदी सरकार शर्म करो, असे जोरजोरात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाववाढीच्या सुरुवातीला प्रचारजीवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून सुद्धा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लाखो लोक, त्यात हजारो परदेशी लोक जमवून नमस्ते ट्रम्प कार्यक्रम केला तिथूनच भारतात कोरोना वाढला, मोदी आणि भाजपच्या वतीने याच काळात मध्यप्रदेशात सत्तापालट खेळ खेळला गेला. बिहार व इतर राज्यात मोठमोठ्या रॅली व प्रचार सभा घेण्यात आल्या. राहुल गांधींनी कोरोना अति धोकादायक आहे उपाययोजना करा म्हणून सांगितले पण त्यावेळी भाजप नेत्यांकडून त्यांची चेष्टा करण्यात आली मोदी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे काळजी न घेतल्यामुळे लाखो लोकांच्या मृत्यू कोरोनामुळे झाला, अनेक मुले अनाथ झाले. महाराष्ट्राला जाणीवपूर्वक रॅमिडिसीवर इंजेक्शन, ऑक्सिजन कमि प्रमाणात देण्यात आला. कोरोना वाढल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी दिवे लावण्याचा, टाळ्या वाजविण्याचा, थाळी वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यामुळे सारा देश गर्दी करत रस्त्यावर आणला, अचानक लोकडाऊन केल्यामुळे मजुरांचे हाल झाले उपासमार झाली. पायी आपल्या गावी चालत निघाले. मुंबईतील बांद्रा मध्ये रेल्वे सुरू करून उत्तर प्रदेश जाण्याची मागणी करून भाजपनेत्यांनी हजारो कामगारांची गर्दी जमविली यामुळे कोरोना वाढला याचे मोदी आणि भाजपवाल्यानी आत्मपरीक्षण केले पाहिजे याउलट महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्ष त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते स्थलांतरित मजुरांना, नागरिकांना रेल्वे तिकीट, जेवण व इतर प्रकारे मदत करत होते तेव्हा भाजपवाले पीएम केयर फंडसाठी पैसे मागत होते हा इतिहास कोणीही विसरणार नाही पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्राबद्दल आकस आहे. ते नेहमीच महाराष्ट्राचा तिरस्कार करतात. मोदीजी आपण सात वर्षे सत्तेवर आहात, रेल्वे तुमच्या अखत्यारीत आहे. विमानतळ बंद केले नाही याउलट कोरोना वाढीस महाराष्ट्र कारणीभूत आहे असे संसदेत आरोप करून महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल मोदींनी माफी मागावी अशी मागणी आम्ही करत आहोत.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस माजी आमदार विश्वनाथ चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, यंग ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते, नगरसेवक विनोद भोसले, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, प्रदेश चिटणीस मनिष गडदे, किसन मेकाले गुरुजी, दक्षिण सोलापूर अध्यक्ष हरीश पाटील, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, लक्ष्मीकांत साका, फ्रंटल अध्यक्ष गणेश डोंगरे, भिमाशंकर टेकाळे, सायमन गट्टू, पशुपती माशाळ, आंबदास गुत्तीकोंडा, आझम सैफन, अनिल मस्के, VD गायकवाड, राजन कामत, हसीब नदाफ, नागनाथ कदम, सिद्राम आनंदकर, विवेक कन्ना, सुमन जाधव, सुनील व्हटकर, राहुल बोळकोटे, सागर शहा, अनुपम शहा, नागनाथ कोप्पा, समीर काझी, सहदेव इप्पलपल्ली, झिशान सय्यद, भिमाशंकर जमादार, मल्लेशी बिडवे, सुधीर लांडे, भीमराव बाळगे, रमेश हासापुरे, अंजली मंगोडेकर, रशीद शेख, विनोद रणसुरे, सुभाष वाघमारे, प्रमिला तुपलवंडे, मोनिका सरकार, बसंती साळुंखे, सुरेखा घाडगे, रुकैया बिराजदार, चंदा काळे, मुमताज तांबोळी, चंदप्पा क्षेत्री, स्नेहल शिंदे, नागनाथ बंगाळे, सुनीता शेरखाने, मीना गायकवाड, युनूस शेख, कांतीलाल धोत्रे, पप्पू गारे, सलीमा शेख, दत्ता नामकर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

शरद पवारांना न्यायालयाची नोटीस

Next Post

रचना इंडस्ट्रीचा राकेश टोळे आणि शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post
रचना इंडस्ट्रीचा राकेश टोळे आणि शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते शुभारंभ

रचना इंडस्ट्रीचा राकेश टोळे आणि शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते शुभारंभ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group