बार्शी : तालुक्यातील वैराग येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी सचिन जहांगिर भोसले आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. सचिन भोसले याने संघटित टोळी तयार करून वैराग कुर्डूवाडी बार्शी तालुका आणि सोलापूर तालुक्यात तसेच उस्मानाबाद शहर व उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोडा टाकणे, चोरी करणे, घरफोडी करणे , ठार मारण्याचा प्रयत्न करणे, फसवणूक करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. या सर्व आरोपींविरुद्ध आता मोक्का लावण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली . उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर अधिक तपास करीत आहेत.