येस न्युज मराठी नेटवर्क ; घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असताना श्रीकांत नल्लातीगला तेलंगणातील तरुणाचा मोबाईल चोरीस गेला आहे. ही घटना होटगी रस्त्यावरील आसरा सोसायटीतील ए/ ४३ या घरामध्ये झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मोटोरोला या कंपनीचा हा मोबाईल १०,००० रुपयांचा असून विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक लोहार अधिक तपास करीत आहेत.