सोलापूर : देगाव -केगाव रस्त्यावर ट्रक चालक रामचंद्र वाघमारे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील २६७० रुपये रोख आणि मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस सबइन्स्पेक्टर देशमाने अधिक तपास करीत आहेत.
*
रिक्षा मधील इलेक्ट्रिक बॅटरी कार टेप व स्पीकर ची चोरी
रिलायन्स मार्केट समोरील न्यू लक्ष्मी चाळ येथील नागेश दीपक गायकवाड याच्या ऑटोरिक्षा मधून इलेक्ट्रिक बॅटरी कार टेप स्पीकर चोरून नेण्यात आल्याची तक्रार फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 28 ऑगस्ट रोजी रात्री ही चोरी झाली असून पोलीस नाईक डोके अधिक तपास करीत आहेत.
*
घराचे कुलूप तोडून कपाटातील ६० हजार लंपास…
साखर पेठ येथील श्रेया अपार्टमेंट येथे राहणाऱ्या भारत गुंडद यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटा मधील ६० हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस सबइन्स्पेक्टर शेख अधिक तपास करीत आहे आहेत.