सोलापूर : जुळे सोलापूर येथील बँक ऑफ इंडिया कॉलनी शेजारील मधुबन नगर येथे राहणाऱ्या कल्लप्पा तुकाराम व्हनहूवे हे गच्चीवर झोपले असताना त्यांच्या उशीशेजारी ठेवलेला पाच हजार रुपयांचा मोबाईल चोरीस गेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चोवीस मे रोजी रात्री ११ ते २५ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ही चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे . विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कांबळे अधिक तपास करीत आहेत.