श्री भारतीय चौक नवरात्र महोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाचे सभासद व प्रती वर्ष कायम देवीस पुजा करणाऱ्या मानकार्यांना चांदीची नाणी भेट देण्याचा कार्यक्रम सोलापूर शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या करण्यात आला.
भारतीय चौक नवरात्र महोत्सव मंडळाचे सचिव सुरेश फलमारी यांनी संस्थेबद्दल संपुर्ण माहिती दिली. याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांनी संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. दैनिक सांजचे अविनाश कुलकर्णी , येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे , ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांनी संस्थेबद्दल शुभेच्छापर भाषणं केली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत चिट्टमपल्ली , नारायण महाले , मोतीलाल मुटकिरी , राजु कामुर्ती , श्रीनिवास फलमारी , अंबादास फलमारी , चित्रकार व्यंकटेश सपार , अशोक खडके , भीमाशंकर आडकी , सुनिल तरटे , सुदर्शन अवधुत , काशिनाथ हुनकेरी , आदी मंडळी उपस्थित होते मधुसुदन संभारम , गणेश मिठ्ठा ,रवींद्र दिकोंडा , दशरथ अन्नलदास, तेजु द्यावरकोंडा ,सुखदेव सग्गम आदी भक्तगण उपस्थित होते.




