येस न्युज मराठी नेटवर्क : आर.एस.मालू चॅरिटेबल ट्रस्ट व सोलापूर जिल्हा माहेश्वरी युवा संगठन संचलित “सोलापूर कपडा बँकेचा”उद्घाटन सोहळा आमदार प्राणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाले.व्यासपीठावर मालू ट्रस्ट चे सतीश मालू,ईश्वर मालू,माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष गिरीश फोफलिया,सचिव शामसुंदर भराडिया व नंदकिशोर भराडिया उपस्थित होते.
आमदार प्राणिती आणि उपायुक्त बापू बांगर यांनी यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.ज्यांच्याकडे वापरात नसलेले अधिक कपडे असतील (स्वच्छ व न फाटलेले) किंवा इच्छेनुसार नवीन कपडे सुद्धा खरेदी करून ते कपडे सोलापूर कपडा बँकेत जमा करावेत आणि ज्या गरजू व्यक्तींना आवश्यक असतील अश्या व्यक्तींनी आपल्या पसंतीचे व आपल्या मापाचे कपडे सदर सोलापूर कपडा बँकेतून मोफत घेऊन जावे असे आवाहन सतिश मालू यांनी केले.
गरजू व्यक्तींचा आत्मसम्मान कोठेही दुखावला जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल असेही मालू यांनी सांगितले.सदर कपडा बँकेला साप्ताहिक सुट्टी सोमवार असेल व इतर दिवशी सकाळी 11 ते सायं 6 पर्यंत सुरू राहील.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.हणमंत जामदार यांनी केले.प्रस्तावना योगेश डागा व आभार शाम भराडिया यांनी मानले.सदर कार्यक्रमास केतन व्होरा,बाजीराव नागावकर, कमल फोफलिया,सचिन तापडिया व माहेश्वरी युवा संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.