• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, February 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आमदार देवेंद्र कोठे प्रभागनिहाय राबविणार ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम

by Yes News Marathi
February 9, 2026
in इतर घडामोडी
0
आमदार देवेंद्र कोठे प्रभागनिहाय राबविणार ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपाच्या पक्ष पदाधिकारी ते बूथ प्रमुखांपर्यंत करणार विकासकामांबाबत संवाद

सोलापूर : प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी ते बूथ प्रमुखांपर्यंतच्या विकासकामांबाबत संवाद करून, विकासकामांसह इतर समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या हेतूने आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून शहर मध्य मतदारसंघात ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रभाग चलो अभियानांतर्गत आमदार देवेंद्र कोठे संबंधित प्रभागातील पदाधिकारी ते बूथ प्रमुखांपर्यंत सर्वांशी विकासकामांबाबत संवाद साधणार आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या प्रभागात, बूथ परिसरात पक्षाचे काम करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय, जमेच्या बाजू, पक्षाची भूमिका, पक्ष विस्तारासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे अपेक्षित योगदान आदी विषयांवर आमदार देवेंद्र कोठे चर्चा करणार आहेत. यात प्रभागाचे नगरसेवक, मंडल पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, आजी-माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी यांचा समावेश आहे.मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक ९ आणि १० साठीचा ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम पद्मनगर येथील आरकाल गार्डन येथे सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत वाजता होणार आहे. बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक ११ आणि १२ साठीचा ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम नितीन नगर येथील राजमाता गार्डनमध्ये सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत होणार आहे.

गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक १३ आणि १४ साठीचा ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम चिप्पा मार्केट समोरील लोटस मंगल कार्यालयातसायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत होणार आहे. शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक १५ आणि १६ साठीचा ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम जुना एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत होणार आहे.बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक १८ आणि २१ साठीचा ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम अंत्रोळीकर नगरातील प्रगती लॉन येथे सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत होणार आहे. शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक २२ आणि २३ साठीचा ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम भैरू वस्ती येथील मातोश्री तराई गार्डन मंगल कार्यालय येथे सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत होणार आहे. या कार्यक्रमांना संबंधित प्रभागातील नगरसेवक, मंडल पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, आजी-माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले आहे.

निवडणुकीनंतर या उपक्रमाचे प्रयोजन काय ?निवडणूक झाल्यानंतरही आमदार देवेंद्र कोठे हा उपक्रम करत आहेत.

कारण पक्षाचे पदाधिकारी निवडणुकीच्यावेळी जनतेपर्यंत जात असतात. जनतेच्या मागण्या काय आहेत याची सविस्तर माहिती या पदाधिकाऱ्यांना असते. पुढील वर्षाच्या निधीमध्ये प्राधान्याने कोणती कामे असावीत, विकासकामे करण्यासठी अडचणी काय आहेत याची माहिती घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पक्षाच्या माध्यमातून विकासकामे झाल्यानंतर संबंधित प्रभागातील पदाधिकऱ्यांचे त्या परिसरात महत्व वाढावे, प्रभागात, बूथ परिसरात सुरू असलेल्या विकासकामांवर बूथप्रमुख स्तरावरील पदाधिकाऱ्यांची देखरेख असावी हा देखील या उपक्रमामागील हेतू आहे.

Previous Post

हरित सोलापूरसाठी वृक्षारोपण – उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In